आपल्या गुंतवणूक क्षेत्रातील ज्ञानामुळे जगप्रसिद्ध असलेल्या वॉरन बफे आपल्या अचूक अंदाजासाठीसुद्धा जाणले जातात. उद्योग विश्वात होणारे बदल बफे अचूकपणे टिपत असतात. वॉरन बफेची गुंतवणूकीच्या संदर्भातील सूत्रे जगभरातून लाखो लोक अंमलात आणत असतात. ज्यांना गुंतवणूकदार, ट्रेडर किंवा उद्योगात आपले स्थान निर्माण करायचे आहे ते वॉरन बफे यांना या क्षेत्रातील दैवतच समजतात इतका बफे यांचा प्रभाव आहे. आर्थिक शिस्त, संयम, अचूक विश्लेषण यासारख्या गुणांनी वॉरन बफे यांनी आपले अढळ स्थान निर्माण केले आहे.
 
जगातला तिसऱ्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती आणि गुंतवणूक गुरू वॉरन बफे यांची काही निवडक गुंतवणूक सूत्रे अशी आहेत.
 
1. फेथ (विश्वास)
 
दिर्घ कालात शेअर बाजार नेहमीच फलदायी असतो. विसाव्या शतकात अमेरिका महायु्द्ध, त्यानंतरची जागतिक मंदी, अनेक मंदीचे कालखंड, लष्करी कारवाया आणि तणाव, राजकीय अस्थैर्य यासारख्या अनेक गोष्टींमध्ये तावून सलाखून निघाली. परंतु तरीही अमेरिकेचा शेअर बाजार म्हणजेच डाऊ जोन्स हा निर्देशांक 66 वरून 24,000 हजारावर पोचला आहे.
 
2. अभ्यासावर आधारित निर्णय प्रक्रिया
 
बफे प्रचंड अभ्यास करतात, मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करतात, शांतपणे त्यावर विचार करतात आणि मगच ते निर्णय घेतात. या प्रक्रियेवर ते भरपूर वेळ खर्च करतात. ते कधीही घाईघाईने अर्धवट माहितीवर आधारित निर्णय घेत नाहीत.
 
3. तयारीत असणे
 
नुसते अंदाज वर्तवण्यापेक्षा प्रत्यक्षात फायदा पदरात पाडून घेणे श्रेयस्कर
 
4. संयम
 
यशस्वी गुंतवणूकीसाठी नेहमीच वेळ, शिस्त आणि संयम लागतात. तुम्ही कितीही मेहनत घेतली किंवी गुणवत्ता दाखवली तरी काही गोष्टींना यशस्वी होण्यासाठी वेळ लागतोच. तुम्ही एका महिन्यात बाळ जन्माला घालू शकत नाही.
 
5. मार्केटशी खेळू नका
 
रोजच्या रोज ट्रेडींग करणारे गुंतवणूकदार नसतात.
 
6. योग्य विचार करा
 
एखाद्या क्षेत्रात प्रतिष्ठा, स्थान निर्माण करण्यासाठी 20 वर्ष लागतात तर त्या नष्ट करण्यासाठी फक्त 5 मिनिटे. योग्य विचार करून निर्णय घेणे महत्वाचे. तुम्ही याचा विचार केलात तर तुम्ही योग्य पद्धतीने गोष्टी हाताळाल.
 
7. भविष्यात दूरवर पाहा
 
कालच्या वाढीतून गुंतवणूकदाराला आजचा नफा मिळत नसतो. दिर्घकालीन दृष्टीकोनातून संपत्ती निर्माण होत असते.
 
8. घाबरू नका
 
कोणत्याही परिस्थितीत गोंधळून किंवा घाबरून जाऊ नका. अशा प्रकारच्या मनस्थितीतून केलेले निर्णय हमखास चुकतात. तुमचे निर्णय सावकाश आणि विचारपूर्वक घ्या. जणूकाही तुम्हाला तुमच्या आयुष्यात ठराविक वेळाच निर्णय घेता येणार आहेत असे समजून चोखंदळपणे निर्णय घ्या.
 
तुम्हालाही यशस्वी गुंतवणूकदार होत संपत्ती निर्माण करायची असेल तर या सूत्रांचा वापर करणे आवश्यकच आहे.

अभिप्राय द्या!