व्हॉटसअॅपवर पा‌ठ‌विण्यात आलेली नोटीस ग्राह्य धरली जाणार असल्याचा महत्वपूर्ण निकाल देऊन  नुकतंच हायकोर्टाने एका प्रकारे व्हॉटसअॅपच्या अधिकृततेवर शिक्कामोर्तब केले. सध्या सबकुछ व्हॉटसअॅपचा जमाना आहे. यामध्ये फिन-टेक कंपन्या तरी मागे कशा राहतील. विशफीन या स्टार्टअप फिन-टेक कंपनीने ट्रान्स युनियन सिबिल बरोबर भागीदारी करत ग्राहकांना त्यांच्या व्हॉटसअॅपवर सिबिल क्रेडिट स्कोअर उपलब्ध करून देण्याचा महत्वपूर्ण करार केला आहे.
 
सिबिल स्कोअरचे महत्व आपण सगळे जाणून आहोतच. देशात कुठेही कर्ज मिळवताना सिबिल स्कोअर हा मुख्य घटक विचारात घेतला जातो. यावरून कर्ज घेणाऱ्याचे पत मूल्यांकन ठरत असते. ७५० पॆक्षा जास्त सिबिल स्कोअर असणाऱ्यांसाठी कर्ज देताना बँका पायघड्या घालतात तर तोच सिबिल स्कोअर ७५० पेक्षा कमी असल्यास कर्ज मिळवताना  गरजूला प्रचंड त्रास सहन करावा लागतो.  
गेल्या काही वर्षात सिबिल पत-गुणांक सुविधा पुरविणाऱ्या क्रेडिट माहिती कंपन्या किंवा क्रेडिट ब्यूरो भारतात कार्यरत आहेत. यापैकी ट्रान्स युनियन सिबिल, इक्विफॅक्स क्रेडिट इन्फर्मेशन सर्व्हिसेस प्रा. लि., एक्सपेरिअन क्रेडिट इन्फॉर्मेशन कं. ऑफ इंडिया प्रा.लि. लि आणि सीआरआयएफ हाय मार्ट क्रेडिट इन्फर्मेशन सर्व्हिसेस प्रा. लिमिटेड – यांसारख्या अनेक कंपन्या ग्राहकांना क्रेडिट स्कोअर, क्रेडिट अहवाल आणि मासिक अपडेट्स पुरविण्याचे काम फिनटेक कंपन्यांच्या साह्याने करीत आहेत. मात्र आता विशफीन या कंपनीने एक पाऊल पुढे जात ही माहिती व्हॉटसअॅपवर उपलब्ध करून देणार आहे.
 
कसा मिळवाल तुमचा क्रेडिट स्कोअर
 
तुम्हाला 8287151151 या मोबाईल नंबरवर फक्त मिस्ड कॉल द्यावा लागेल किंवा www.wishfin.com या वेबसाइटवर जाऊन तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर करा. यानंतर तुम्हाला विशफीन सिबिल स्कोअर या अधिकृत खात्यावरून संदेश येईल. ज्यामध्ये तुम्हाला तुमचे नाव, जन्मतारीख, पॅन कार्ड यासारखी माहिती भरताच तुम्हाला तुमचा क्रेडिट स्कोअर मिळेल. तसेच पुढील एक वर्षासाठीच्या अपडेट्स देखील मिळत राहतील. 

अभिप्राय द्या!