असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्‌स इन इंडिया (ऍम्फी) ‘जन निवेश’ या राष्ट्रव्यापी गुंतवणूकदार जागरूकता मोहिमेची मुंबईत आज सुरुवात केली. या मोहिमेचा एक भाग म्हणून मुंबई, बडोदा आणि नोएडा येथे गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडात गुंतवणुकीची शपथ घेतली. या प्रसंगी नागरी उड्डान राज्यमंत्री जयंत सिन्हा, सेबीचे पूर्णवेळ सदस्य जी. महालिंगम, ऍम्फीचे अध्यक्ष ए. बालासुब्रह्मण्यन आदी उपस्थित होते. नागरिकांना बचतीच्या सवयीचा फेरआढावा घ्यावा आणि म्युच्युअल फंडात गुंतवणुकीला विचारात घ्यावे या उद्देशाने जन निवेश मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. लोकांना 18008333666 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन अथवा www.jannivesh.in या संकेतस्थळाच्या माध्यमातून दरमहा आपल्या एका दिवसाची मिळकत म्युच्युअल फंडात गुंतविण्यासंबंधी शपथ घेऊन या मोहिमेत सामिल होता येईल, असे ऍम्फीने म्हटले आहे.

अभिप्राय द्या!