सर्वागाने सुरक्षितता हव्या असलेल्या गुंतवणूकदारांसाठी रोखेसंलग्न अर्थात डेट योजना सर्वाधिक पसंतीचा पर्याय ठरत आहे. सध्या म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांमध्ये नियोजनबद्ध गुंतवणुकीचे लोकप्रिय माध्यम ठरलेल्या ‘एसआयपी’ पद्धतीनेही डेट फंडातही मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक ओघ सुरू आहे,
आजवर स्थिर उत्पन्न पर्यायातील लिक्विड तसेच लो डय़ुरेशन फंडांचा वापर हा बहुतांश बडे उद्योग, संस्थात्मक गुंतवणूकदार तसेच उच्च संपदा असणारे व्यक्ती (एचएनआय) करीत असल्याचे दिसत होते, परंतु आता छोटे व्यक्तिगत गुंतवणूकदारही त्याचा खुबीने वापर करीत आहेत, असे निरीक्षण बिश्नोई यांनी नोंदविले. अगदी पगारदारही दरमहा त्यांचे वेतन बँकेत जमा होण्यासरशी लिक्विड फंडात, जशी गरज पडेल तसे ते काढू लागल्यास त्यांना यातून चांगला लाभ कमावता येतो असे दिसून आले आहे.