येस बॅंकेला म्युच्युअल फंड व्यवसायासाठी सिक्युरिटिज अॅंड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) परवानगी दिली आहे. त्यामुळे आता येस बॅंकेला म्युच्युअल फंड व्यवसायात उतरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बॅंकेने एका प्रसिद्धि पत्रकाद्वारे यासंबंधीची माहिती दिली.
याआधी रिझर्व बॅंक ऑफ इंडियाकडून येस बॅंकेला यासंदर्भातली परवानगी मिळाली होती. त्यानंतर सेबीचीसुद्धा परवानगी येस बॅंकेला मिळाली आहे. येस बॅंकेच्या म्युच्युअल फंड कंपनीचे नाव येस अॅसेट मॅनेजमेंट (इंडिया) लिमिटेड (वायएएमआयएल) असे असणार आहे. येस बॅंकेच्या बॅंकींग क्षेत्रातील ज्ञानाचा तसेच या क्षेत्रातील गुंतवणूकदारांशी असलेल्या नात्याचा फायदा नव्या म्युच्युअल फंड व्यवसायाला होईल,.
येस बॅंकेच्या व्यवसायाचा तसेच डिजीटल पॉलिसीचा फायदा येस अॅसेट मॅनेजमेंट (इंडिया) लिमिटेडला होईल असेही कपूर म्हणाले. येस अॅसेट मॅनेजमेंट (इंडिया) लिमिटेड डेट आणि इक्विटी प्रकारातील आपले म्युच्युअल फंड 6 ते 12 महिन्यांच्या अवधित बाजारात आणणार आहे.

अभिप्राय द्या!