भारतातील आघाडीची शेअर ब्रोकींग फर्म असलेल्या प्रभुदास लिलाधरने (पीएल) आपल्या ग्राहकांसाठी मोबाईलआधारे शेअर आणि करन्सी ट्रेडिंगसाठी पीएल मोबाईल अॅपची सुविधा उपलब्ध केली आहे.

पीएलच्या या अत्याधुनिक अॅपमध्ये शेअर्ससंबंधी इत्यंभुत माहिती, सखोल निरीक्षणयादी याचबरोबर शेअर, डेरिव्हेटीव्हज, कमोडीटी आणि चलन (करन्सी) आदी अन्य प्रकारच्या व्यवहारांबाबतही क्षणाक्षणाला माहिती मिळणार आहे. गुंतवणूकदार आणि ट्रेडर्स यांच्यासाठी अॅपमध्ये अनेक पुरक टुल्स आहेत. ही टूल्स विशिष्ट सॉफ्टवेअरवर आधारीत इंजिन असून योग्य वेळेस गुंतवणूक आणि व्यवहारांची संधी लक्षात आणून देते. या अॅपच्या अन्य वैशिष्टांमध्ये शेअरबाजारातील व्यवहारांचे चार्टही मिळतात. शेअर ट्रेडींगशी संबंधित सुविधा या पीएलच्या ग्राहकांनाच उपलब्ध असुन ग्राहक नसलेल्यांना गेस्ट लॉगिन वापरुन सर्व सुविधा उपलब्ध होतील परंतु शेअर्सचे भाव काही मिनिटांच्या विलंबाने मिळतील.

अभिप्राय द्या!