संपत्ती व्यवस्थापन आणि वित्तीय सेवांचे व्यवस्थापन करणाऱ्या एडलवाइज ग्रुपने मोठ्या गुंतवणूकदारांना गुंतवणुकीसाठीची नवीन योजना जाहीर केली आहे. ‘एडलवाइज क्रॉसओव्हर ऑपॉर्च्युनिटीज फंड – सिरीज 2’ या योजनेमध्ये मोठ्या गुंतवणूकदारांना गुंतवणुकीसाठी पारंपरिक पर्यायांऐवजी अधिक परतावा देणाऱ्या पर्यायाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये ज्या कंपन्यांचे आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले झाले नाहीत. मात्र अशा कंपन्यांची कामगिरी दमदार राहिली आहे आणि लवकरच त्यांचे आयपीओ बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी मोठ्या गुंतवणूकदारांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.
याविषयीसंबंधांची माहिती देताना एडलवाइज पर्सनल वेल्थ अॅडव्हायझरीचे वरिष्ठ उपाध्यक्ष सीमांत शुक्ला म्हणाले, “विविध क्षेत्रात दमदार कामगिरी करणाऱ्या आणि शेअर बाजारामध्ये आयपीओ दाखल करण्याच्या तयारीत असलेल्या अनेक कंपन्या आहेत. मात्र त्या पब्लिक लिस्टिंग न झाल्यामुळे त्यामध्ये गुंतवणूक करता येत नाही. क्रॉसओव्हर ऑपॉर्च्युनिटीज फंडाद्वारे अशा कंपन्यांमध्ये गुंतवणुकीसाठीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. जेणेकरून त्याचा गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकेल.”