आयपीओतील तीन महिन्यातील घसरणीमुळे आयसीआयसीआय सिक्युरिटिजच्या शेअरकडे म्युच्युअल फंड पाठ फिरवत आहेत. मार्च महिन्यात आयसीआयसीआय सिक्युरिटिजचा आयपीओ बाजारात आला होता. त्यानंतर म्युच्युअल फंड कंपन्यांनी 352 रु. आणि 421 रु. या किंमतींवर या आयपीओत गुंतवणूक केली होती.
मात्र आयसीआयसीआय सिक्युरिटिजच्या शेअरमध्ये सातत्याने होत असलेल्या घसरणीमुळे आता म्युच्युअल फंड कंपन्या यातून आपली गुंतवणूक काढून घेत आहेत. एचडीएफसी म्युच्युअल फंड, अॅक्सिस म्युच्युअल फंड, रिलायन्स म्युच्युअल फंड, एडेलवाईस म्युच्युअल फंड आपल्या काही योजनांमधून आयसीआयसीआय सिक्युरिटिजच्या शेअरची गुंतवणूक कमी करत आहेत.