कोटक म्युच्युअल फंडाने आपली नवीन योजना बाजारात आणली आहे. कोटक बॅलन्स अॅडव्हान्टेज फंड असे या नव्या म्युच्युअल फंड योजनेचे नाव आहे. ही एक ओपन एंडेड इक्विटी प्रकारातील बॅलन्स योजना आहे. या योजनेद्वारे इक्विटीबरोबरच इक्विटीसंबंधित सिक्युरिटिज, कर्जरोखे आणि मनी मार्केट सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक केली जाणार आहे. या योजनेत इक्विटीतील गुंतवणूकीसाठी मल्टीकॅप फंडांचे धोरण तर डेट प्रकारातील गुंतवणूकीसाठी डायनामिक बॉँडचे धोरण स्वीकारले जाणार आहे.
नव्या फंडाची ऑफर 13 जुलै रोजी खूली होत आहे. तर 27 जुलै ही त्याची अंतिम तारीख आहे. त्यानंतर नियमित खरेदी आणि विक्रीसाठी ही योजना 10 ऑगस्टपासून उपलब्ध असणार आहे.

अभिप्राय द्या!