भारतीय रिझर्व्ह बँकेने डिमांड ड्राफ्ट (डीडी) च्या नियमात बदल केला आहे. डिमांड ड्राफ्टवर बनवणाऱ्या व्यक्तीच्या नावाचा उल्लेख करणं केंद्रीय बँकेनं बंधनकारक केलं आहे. हा नवा नियम येत्या १५ सप्टेंबर २०१८ पासून लागू होणार आहे.

बँकेच्या शाखेतून डिमांड ड्राफ्ट खरेदी करणाऱ्या व्यक्तीचे नाव सुद्धा डीडीच्या फ्रंटवर लिहिणं गरजेचं आहे. ज्या व्यक्तीच्या नावानं डिमांड ड्राफ्ट करायचा आहे त्या संस्थेचा किंवा त्या व्यक्तीच्या नावाचा उल्लेख केला जायचा. परंतु, आता या नियमांत बदल करण्यात आला आहे. आरबीआयने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेत याविषयी माहिती दिली आहे. डिमांड ड्राफ्टची खरेदी करणाऱ्या व्यक्तीचे नाव माहिती होत नसल्याने उद्भवलेली अडचण लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

अभिप्राय द्या!