तुम्हीसुद्धा तुमच्या कर्जाचा नीट विचार करा आणि ईएमआयच्या विळख्यातून बाहेर पडा.
- आय पाहून खर्च. स्टेट्स सांभाळताना खिसे खाली नको.
-
कर्ज घेताना आपण नक्की का कर्ज घेतोय – खर्च वाढवण्यासाठी (वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज) की गरज भागवण्यासाठी (गृह कर्ज, शैक्षणिक कर्ज)? या कर्जाची आपल्याला खरंच गरज आहे का? ईएमआयच्या व्यतिरिक्त अजून कोणते खर्च करावे लागणार? या प्रश्नांचं निश्चित उत्तर मिळवा. चैनीसाठी कर्ज घेऊ नका.
-
मिळकतीच्या ४० टक्क्य़ांपर्यंत ईएमआय ठीक आहे. त्यापेक्षा जास्त असेल तर जरा परत एकदा तपासा.
-
नवीन नोकरी लागल्यावर शक्यतो कर्ज घेणं टाळा. जास्तीत जास्त पैसे वाचवून गुंतवणूक करा.
-
घरासाठी कर्ज घ्यायच्या आधी किमान ७-८ वर्ष शेअर्स किंवा म्युचुअल फंडामध्ये नियमित गुंतवणूक करा.
-
क्रेडिट कार्डवर मिळणारी कर्ज फक्त इमर्जन्सीसाठी वापरा. क्रेडिट कार्डाचा वापर कमी करा. त्याऐवजी डेबिट कार्ड वापरा. खर्च आपोआप कमी होईल.
-
घेतलेली कर्ज किती व्याजावर आहे याचा वेळोवेळी अभ्यास करा. गरज असल्यास कर्ज हस्तांतरण (लोन ट्रान्सफर) करा.
-
चैन किंवा हौसेसाठी खर्च करा, पण कर्ज घेऊन नाही! आर्थिक पाया मजबूत करा आणि मग खुशाल मजा करा.
-
रिटायरमेंटच्या जवळपास कर्ज घेताना पुढील २०-२५ वर्षांच्या काळाचा खर्चाचा हिशेब नक्की घाला. कदाचित तुम्हाला कर्जाची परतफेड न झेपणारी असेल.
* कर्ज घेऊन गुंतवणूक करताना खूप विचार करा. गुंतवणुकीतून मिळणारे परतावे, जोखीम आणि कर्जाचं व्याज याचा ताळमेळ नीट बसवून मग निर्णय घ्या.