युनियन अॅसेट मॅनेजमेंट कंपनीने युनियन इक्विटी सेव्हिंग्स फंड बाजारात आणला आहे.
ही एक ओपन एंडेड योजना असून इक्विटी, आर्बिट्राज आणि डेट प्रकारात यातून गुंतवणूक केली जाणार आहे. डाव्हर्सिफाइड इक्विटी, डेट आणि आर्बिट्राज प्रकारातून गुंतवणूक करून भांडवलवृद्धी करण्याचे या फंडाचे उद्दीष्ट आहे. नव्या फंडाची ऑफर आज (19 जुलै) खूली होते आहे. या ऑफरची अंतिम मुदत 30 जुलै आहे. या नव्या फंडाचे फंड मॅनेजर युनियन म्युच्युअल फंडाचे मुख्य गुंतवणूक अधिकारी विनय पहारिया हे असणार आहेत.
 
या फंडाद्वारे लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप प्रकारातील शेअरमध्ये गुंतवणूक केली जाणार आहे. ज्यावेळेस शेअर बाजाराच्या निर्देशांकात वाढ होईल तेव्हा इक्विटी प्रकारातील गुंतवणूक कमी करण्याचे तर ज्यावेळी शेअर बाजाराच्या निर्देशांक खाली जाईल तेव्हा इक्विटी प्रकारातील गुंतवणूक वाढवण्याचे या फंडाचे धोरण असणार आहे. ज्या गुंतवणूकदारांना भांडवलातील वृद्धीबरोबरच स्थैर्य हवे आहे त्यांच्यासाठी हा फंड गुंतवणूकीसाठी उत्तम पर्यायआहे !!

अभिप्राय द्या!