देशातील आघाडीची म्युच्युअल फंड कंपनी आदित्य बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंडाने गुंतवणूकदारांसाठी नवीन योजना जाहीर केली आहे. ‘आदित्य बिल सन लाईफ फिक्सड टर्म प्लॅन- सिरीज क्यू पी 1100 दिवस’ असे नवीन योजनेचे नाव आहे. नवीन योजनेतील गुंतवणूक हे क्लोज एंडेड इन्कम प्रकारातील आहे. नवीन फंड ऑफर (एनएफओ) 20 जुलै पासून 25 जुलैपर्यंत उपलब्ध असणार आहे. एनएफओ काळात गुंतवणूक करण्यासाठी एका युनिटची दर्शनी किंमत 10 रुपये आहे. योजनेचा एनएफओ खरेदी करण्यासाठी कमीत कमी 1000 रुपयांची गुंतवणूक बंधनकारक आहे.
 
‘आदित्य बिर्ला सन लाईफ फिक्सड टर्म प्लॅन- सिरीज क्यू पी 1100 दिवस’ या योजनेअंतर्गत फंडात गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवल्यानंतर हे पैसे फंडातर्फे प्रामुख्याने सरकारी व राज्य विकास सिक्युरिटीज मध्ये गुंतवले जाणार आहेत. ऍसेट अलोकेशनच्या मर्यादेत राहून टी- बिल्स, रेपो, रिव्हर्स रेपो आणि सीबीएलओ अशा मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट्‌समध्ये योजनेचे व्यव्थापन केले जाणार आहे. या योजने साठी कुठलाही एन्ट्री किंवा एक्झिट लोड नाही. 

अभिप्राय द्या!