केंद्र सरकारने मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुरु केलेल्या सुकन्या समृद्धी योजनेत काही बदल केले आहेत. आता सुकन्या समृद्धी योजनेतील  किमान जमा रकमेची मर्यादा कमी करण्यात आली आहे. सुकन्या समृद्धी योजनेत योजना सुरु ठेवण्यासाठी वर्षभरात किमान एक हजार रुपये भरणे गरजेचे होते. आता वर्षभरात अडीचशे रुपये भरूनही या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
 
सुकन्या समृद्धी योजनेत अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे यासाठी किमान रकमेची मर्यादा कमी केल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच आता वर्षभरात भरावयाची रक्कम एक हजारवरून कमी करून अडीचशे रुपये केल्याने  योजनेत सहभागी होणाऱ्यांची संख्या वाढेल .
 
केंद्र सरकारच्या आकडेवारी नुसार, या योजनेत आतापर्यंत १९ हजार १८३ कोटी रुपये जमा झाले आहेत. त्यावर जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत  ८.१ टक्के व्याज देऊ केले आहे.

अभिप्राय द्या!