रिलायन्स म्युच्युअल फंडाकडून गुंतवणूकदारांसाठी नवीन योजना जाहीर केली जाणार आहे.
त्याअंतर्गत, रिलायन्स म्युच्युअल फंडाच्या 17 योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 1 लाख 20 हजारांपासून 50 लाखांपर्यंतचा जीवन विमा मिळणार आहे. ‘सिप इन्शुर’ असे योजनेचे नाव असून, 1 जून 2018 पासून या योजनांमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना हा लाभ मिळणार आहे. यासंदर्भात कंपनीकडून एक व्हिडीओ प्रकाशित केला आहे. 
 
सिप इन्शुर योजनेअंतर्गत कंपनीने 17 योजनांची निवड केली आहे. त्यानुसार, गुंतवणुकीच्या तिसऱ्या वर्षानंतर, महिन्याच्या गुंतवणूक रकमेच्या 120 टक्के किंमतीचा विमा गुंतवणूकदाराला मिळणार आहे. म्हणजे, कमीत कमी 1000 रुपयांचा हप्ता असणाऱ्या गुंतवणूकदाराला रकमेच्या 120 टक्के म्हणजे 1,20,000 रुपयांपर्यंतचा विमा मिळणार आहे. याप्रमाणे जास्तीत जास्त 50 लाख रुपयांपर्यंतच्या विम्याचा फायदा गुंतवणूकदारला घेता येणार आहे. 18 वर्षे पूर्ण ते वय वर्षे 51 पर्यंतच्या गुंतवणूकदारांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
 
‘सिप इन्शुर’योजनेअंतर्गत योजनेचा कालावधी संपल्यानंतर किंवा गुंतवणूकदाराने वयाची 55 वर्षे पूर्ण केल्यानंतर विमा योजना लागू असणार नाही, तसेच, योजनेमधील रकमेचा काही भाग काढून घेतल्यास किंवा मधेच योजना थांबवल्यास विम्याचा लाभ मिळणार नाही. याशिवाय, विम्याचा लाभ घेण्यासाठी निवडलेल्या योजनेचा मासिक हप्ता कुठलाही खंड न पडता सलग भरणे आवश्यक आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे, एका पॅन क्रमांकाला एकाच विम्याचा लाभ मिळणार आहे. म्हणजे, एकूण 17 विमा योजनांपैकी फक्त एकाच योजनेचा विमा लागू असणार आहे. 

अभिप्राय द्या!