महिंद्रा म्युच्युअल फंडाने नवी क्रेडीट रिस्क योजना बाजारात आणली आहे.
हा एक ओपन एंडेड डेट फंड आहे. मध्यम कालावधीत सुरक्षित गुंतवणूक करणाऱ्यांसाठी ही योजना आणण्यात आली आहे. या योजनेद्वारे एए मानांकन असलेले बॉंड, सरकारी कर्जरोखे आणि मनी मार्केटमध्ये मुख्यत: गुंतवणूक केली जाणार आहे. गुंतवणूकीची जोखीम आणि परतावा यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न या योजनेत केला गेला आहे. या योजनेच्या एका युनिटचे दर्शनी मूल्य 10 रुपये आहे. ही योजना 27 जुलै रोजी खुली होते आहे आणि 10 ऑगस्ट ही त्याची अंतिम मुदत आहे. त्यानंतर पाच दिवसांनी युनिट्सच्या खरेदी आणि विक्रीसाठी हा फंड पुन्हा उपलब्ध असेल.

अभिप्राय द्या!