म्युच्युअल फंड क्षेत्रात आता सॅमको सिक्युरिटीज आणि इक्विटी इंटेलिजन्स इंडिया या दोन नवीन म्युच्युअल फंड कंपन्यांची भर पडली आहे. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबीने दोन्ही कंपन्यांना म्युच्युअल फंड व्यवसाय सुरु करण्यास मंजुरी दिली आहे.
 
सॅमको सिक्युरिटीज एक ऑनलाइन डिस्काउंट ब्रोकरेज फर्म आहे  तर इक्विटी इंटेलिजन्स इंडिया ही कंपनी पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस (पीएमएस) आणि अल्टरनेट इन्व्हेस्टमेंट फंड (एआयएफ) चालविते. मुंबई येथे मुख्यालय असलेल्या सॅमको सिक्युरिटीजचे जेमीत मोदी यांनी याच वर्षी जूनमध्ये सेबीकडे अर्ज केला होता. तर कोची येथे मुख्यालय असलेल्या इक्विटी इंटेलिजन्स इंडियाने जानेवारीमध्ये म्युच्युअल फंड व्यवसाय सुरु करण्यासंबंधी अर्ज केला होता. 
 
सेबीकडे मुथुट फायनान्स, फ्रंटलाइन कॅपिटल सर्व्हिसेस, कार्वी स्टॉक ब्रोकिंग, ट्रस्ट इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझर्स या कंपन्यांनी देखील  म्युच्युअल फंड व्यवसाय सुरु करण्यासाठी अर्ज केला आहे.

अभिप्राय द्या!