म्युच्युअल फंड गुंतवणूक मालमत्ता गेल्या चार वर्षात दुप्पट झाली असून गुंतवणूकीसाठी हा उत्तम पर्याय आहे, असे मत सेबीचे अध्यक्ष अजय त्यागी यांनी व्यक्त केले आहे. सेबीने दरम्यानच्या काळात म्युच्युअल फंड व्यवसायात अनेक सुधारणासुद्धा केल्या आहेत. पुढील महिन्यात अॅम्फी म्हणजेच असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडियाबरोबर बैठक असल्याचेही त्यागी यांनी सांगितले. सध्या बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी उच्चांकी पातळीवर आहेत. उद्योन्मुख बाजारपेठांमधल्या सेन्सेक्सने चांगला परतावा दिल्याचेही त्यागी यांनी सांगितले. भारतातील म्युच्युअल फंड व्यवसाय देशाच्या जीडीपीच्या 11 टक्के असून जगभरातील याची सरासरी 62 टक्के इतकी आहे. म्युच्युअल फंड व्यवसायात वार्षिक 20.57 टक्के इतकी वृद्धी झाली आहे.

अभिप्राय द्या!

Close Menu