अर्थ मंत्रालय सीपीएसई (सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्राईझेस) एक्सचेंज ट्रेडेड फंडातील घटकांची पुनर्रचना करण्याची शक्यता आहे. या फंडाद्वारे सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलेली आहे. अर्थ मंत्रालय त्यात नव्याने आणखी काही सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचा समावेश करण्याचा किंवा या कंपन्यांमधील सरकारचा हिस्सा कमी करत 52 टक्क्यांपर्यत आणण्याचा विचार करते आहे. सीपीएसई ईटीएफमध्ये 10 सार्वजनिक क्षेत्रातील ब्लूचीप कंपन्यांचा समावेश आहे.
सरकारचा या कंपन्यांमधील हिस्सा 55 टक्क्यांवर आल्यावरच या कंपन्यांच्या शेअरची विक्री करता येणार आहे. यातील बहुसंख्य कंपन्यांमध्ये सरकारची हिस्सेदारी 55 टक्क्यांवर किंवा त्याच्या आसपास आल्याने या फंडाची पुनर्रचना करण्याचा सरकारचा विचार आहे. सीपीएसई ईटीएफच्या चौथा टप्पा बाजारात आणण्यासाठी सरकारकडून सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीज आणि एसएमसी कॅपिटलने या फंडाचा सल्लागार होण्यासाठी बोली लावली आहे.

अभिप्राय द्या!