जगभरातील इक्विटी म्युच्युअल फंडातील एक्सपेन्स रेशो सर्वात कमी असलेल्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे. फेडरेशन ऑफ इंडिपेंडंट फायनायन्शियल अॅडव्हायझर्सने (फिफा) 25 देशांच्या केलेल्या पाहणी अहवालात ही गोष्ट समोर आली आहे. इक्विटी म्युच्युअल फंडातील सर्वात कमी एक्सपेन्स रेशो असलेल्या देशांमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. जगात सर्वच देशांमधल्या म्युच्युअल फंड नियंत्रक संस्थांचा म्युच्युअल फंड कंपन्यांवर एक्पेन्स रेशो कमी करण्यासाठी दबाव आहे. 
 
एक्सपेन्स रेशो म्हणजे गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडात गुंतवलेल्या रकमेवर म्युच्युअल फंड कंपन्या सर्व्हिस चार्च वसूल करतात. हा चार्च गुंतवणूकीच्या रकमेतून वळता करण्यात येतो. एक्सपेन्स रेशो कमी करून जास्तीत जास्त लोकांना म्युच्युअल फंड गुंतवणूकीकडे आकर्षित करण्यासाठी जगभरातच दबाव निर्माण झाला आहे. 
 
भारतात इक्विटी फंडातील एक्सपेन्स रेशो 1.88 टक्के इतका आहे. नॉर्वेमध्ये एक्सपेन्स रेशो 1.80 टक्के तर जपानमध्ये 1.87 टक्के इतका आहे. मात्र जगभरातील इक्विटी फंडातील एक्सपेन्स रेशोचे प्रमाण सरासरी 2.15 टक्के इतके आहे. इंग्लंडमध्ये एक्सपेन्स रेशो सर्वाधिक म्हणजेच 2.83 टक्के इतका आहे.

अभिप्राय द्या!