युनोच्या लोकसंख्या वाढीच्या अभ्यासानुसार माणसाचे सरासरी आयुष्य हे २०५० पर्यंत ७५ वर्षे होणार आहे. त्यामुळे प्रत्येकाला वाढत्या माहागाइला तोंड देण्यासाठी आपले उत्पन्न वाढवण्याचे प्रयत्न हे करावेच लागतात. सेवानिवृत्ती नंतरचे नियोजन तर अपरिहार्य आहे. हा विषय लक्षात घेऊन युटिआय ने एक निवृत्ति विशेष योजना साकारली आहे. तिची वैशिष्ठे खालील प्रमाणे :

  1. यामधे दरमहा किमान रु. ५०० भरणे आवश्यक आहे.
  2. यामधून मिळणाऱ्या परताव्याचा व्याजदर हा साधारणतः ११% पेक्षा जास्त (CAGR) चक्रवाढीसह मिळू शकतो.
  3. वर्षात एकूण जमा रकमेवर 80 c अंतर्गत करसवलत प्राप्त होते.
  4. भरलेली रक्कम ५ वर्षानंतर केव्हाही काढता येते. यामधे गुंतवणुकीसाठी कमाल वयोमर्यादा नाही.
  5. यामधे online व अॅपद्वारे सुध्दा गुंतवणूक करता येते.
  6. बँकेद्वारे एकदा सूचना देऊन पैसे वरचेवर भरणा करणेची सुध्दा सुविधा उपलब्ध आहे.
  7. पैसे काढतानासुध्दा ऑनलाइन अॅपद्वारे सूचना देऊन परस्पर बँक खात्यात एका दिवसात पैसे जमा करता येतात.