बांधकाम व अभियांत्रिकी क्षेत्रातील देशातील मोठी कंपनी असलेल्या लार्सन अँड टुब्रोने (एल अँड टी) आपले शेअर बायबॅक करण्याचा आपला विचार व्यक्त केला आहे. यासंदर्भात कंपनीने सेबीला कळविले असून येत्या २३ ऑगस्टला होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत याविषयीचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच, २० ते २४ ऑगस्टपर्यंत संचालक मंडळ, वरिष्ठ अधिकारी आणि विशिष्ट कर्मचाऱ्यांना कंपनीचे शेअर्स घेण्याला अटकाव करण्यात आल्याचे देखील कळविले आहे.
 
इन्फ्रास्ट्रक्चर व्यवसायात केलेल्या दमदार कामगिरीने कंपनीला मागील तिमाही सत्रात ३६ टक्क्यांचे निव्वळ नफा झाला आहे. जूनमध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीला निव्वळ १२१५ कोटींचा फायदा झाला आहे. जो मागील वर्षी याच सत्रात ८९३ कोटी होता. 
 
शेअर्सचे बायबॅक हा कंपन्यांसाठी फायदेशीर ठरणार निर्णय असतो. ग्राहकांना द्यावा लागणाऱ्या कॅश डिविडेंड पेक्षा बायबॅकच्या माध्यमातून कंपनीला कमी टॅक्स भरावा लागतो. तोच कॅश डिविडेंडमार्फत गेल्यास जास्त राहतो. तसेच, ग्राहकांकडे एकूण असणारा कंपनीचा ताबा कमी करून कंपनीचे वर्चस्व स्थापन करता येते. शिवाय बाजारात कंपनीच्या शेअर्स तुलनेने कमी पातळीवर व्यवहार करत आहेत असे वाटल्यासदेखील कंपन्या बायबॅकचा निर्णय घेऊन कंपनीच्या शेअर्सचे मूल्य वाढवितात. 

अभिप्राय द्या!