म्युच्युअल फंडातील गुंतवणूक हा एक गुंतवणूक सुरक्षित आणि पारदर्शक पर्याय म्हणून ओळखला जातो. सेबी त्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते. म्युच्युअल फंड गुंतवणूक अधिक सुरक्षित व्हावी त्यात आणखी पारदर्शकता यावी आणि माहितीचे विश्लेषण करून ब्रोकर्सवर लक्ष ठेवता यावे यासाठी स्वयंचलित स्वरुपाचे सॉफ्टवेअर सेबीकडून विकसित केले जाणार आहे.
मॉनिटरिंग ऑफ म्युच्युअल फंड्स अॅंड ऑटोमेशन ऑफ इन्स्पेक्शन ऑफ ब्रोकर्स असे या प्रकल्पाचे नाव आहे. याद्वारे सेबीचे स्वत:ची असे अद्ययावत नियंत्रण आणि देखरेख करणारे तंत्रज्ञान असणार आहे. यासाठी अनेक कंपन्यांचे प्रस्तावदेखील सेबीकडून मागविण्यात आले आहेत. म्युच्युअल फंड व्यवसायात भविष्यात येऊ घातलेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा आधार घेऊन गुंतवणूकदारांची गुंतवणूक अधिकाधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्याचा सेबीचा प्रयत्न आहे.

अभिप्राय द्या!