पंतप्रधान जनधन योजनेला मिळालेल्या मोठ्या यशानंतर केंद्र सरकार सर्वसामान्यांसाठी ‘सोने बचत खाते’ सुरू करण्याचा विचार आहे.
या खात्याच्या नियमानुसार खात्यात रक्कम जमा करतेवेळी त्या दिवशीच्या बाजारभावाप्रमाणे सोने संबंधिताच्या खात्यात जमा करण्यात येईल. जर, संबंधिताच्या या खात्यात साठ हजार रुपये जमा असतील तर, त्याला सध्याच्या ३०,००० रुपयांना १० ग्रॅम या भावाप्रमाणे २० ग्रॅम सोने जमा करण्यात येईल. ग्राहकाच्या पासबुकमध्ये तशी नोंद करण्यात येईल. त्यावर ग्राहकाला अडीच टक्क्यांनी व्याजही मिळणार आहे. किमाने एक ग्रॅम सोने जमा होईल, इतकी रक्कम खात्यात जमा असणे आवश्यक आहे. जर खात्यातून रक्कम काढली गेली तर, त्यावर आयात शुल्क लागू होणार नाही. या खात्यामध्ये रोख रक्कम आणि सोने जमा करता येणार आहे.