एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स कंपनी या आघाडीच्या आयुर्विमा कंपनीने आज ‘एचडीएफसी लाईफ क्लासिक वन’ ही सिंगल प्रिमियम यूएलआयपी योजना सादर केल्याची घोषणा केली. ही योजना संभाव्य उच्च परताव्यांच्या माध्यमातून मालमत्ता निर्माण करणे आणि विमा कव्हरच्या स्वरुपात आर्थिक संरक्षण देणे असे दुहेरी लाभ देते.
 
पगारदार, तसेच स्वयं-रोजगार असलेल्या व्यक्तींना काहीवेळा अतिरिक्त आर्थिक लाभ होतो. हा लाभ बोनस, आर्थिक योजनेच्या पूर्तीच्या माध्यमातून किंवा अचानक मालमत्तेमध्ये वाढ होण्याच्या माध्यमातून होऊ शकतो. हा अतिरिक्त लाभ गुंतवणूक करण्यासाठी योग्य आर्थिक साधन निवडणे अवघड ठरू शकते. आज यासाठी बाजारपेठेमधील हालचालींमधून अधिक लाभ देण्याची लवचिकता असलेली, तसचे भरलेल्या सिंगल प्रिमियमच्या १० पट आयुर्विमा देणारी फारच कमी साधने उपलब्ध आहेत. 
 
एचडीएफसी लाईफ क्लासिक वन ही योजना याच गरजेची पूर्तता करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. हे उत्पादन व्यक्तींना सिंगल-प्रिमियम पेमेंटच्या माध्यमातून बाजारपेठेशी संलग्न योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासोबतच दीर्घकाळापर्यंत गुंतवणूक ठेवण्याची संधी देते. हे उत्पादन पॉलिसीधारकांना डेट, इक्विटी व संतुलित फंड व्यासपीठांमध्ये नऊ फंड पर्यायांची सुविधा देते. 

अभिप्राय द्या!