खालील समभागावर लक्ष असुद्या !!
1. रिलायन्स इंडस्ट्रीज :
आंतरराष्ट्रीय ब्रोकरेज फर्म सीएलएसएने रिलायन्सचा शेअर विकत घेण्याकडे कल दाखवला आहे. 
 
2. भारत फोर्ज :
क्रेडीट सुझे या प्रसिद्ध वित्तसंस्थेने भारत फोर्ज निर्यातीतून चांगला महसूल मिळवेल असे सांगत भारत फोर्जवर लक्ष दिले आहे.
 
3. ग्रासिम इंडस्ट्रीज :
डाईश बॅंकेला ग्रासिम इंडस्ट्रीजकडून मोठ्या अपेक्षा आहेत. कंपनी चांगला नफा मिळवेल असे मत डाईश बॅंकेने व्यक्त केले आहे.
 
4. टाटा मोटर्स :
नोमुरा या ब्रोकरेज फर्मने टाटा मोटर्सवर विश्वास दाखवला आहे. जग्वारची चीनमध्ये वाढत असलेली मागणी पाहता, पुढील वर्षी होणारी कंपनीची वाटचाल दमदार असेल असे मत नोंदवण्यात आले आहे.
 
5. आयसीआयसीआय :
सीआयटीआयने आयसीआयसीआय बॅंकेच्या बाजूने कौल दिला आहे. 2020 पर्यत आयसीआयसीआय बॅंक 15 टक्क्यांपर्यत परतावा देईल असा विश्वास सीआयटीआयने दाखवला आहे.

अभिप्राय द्या!