केंद्रीय अर्थमंत्रालयाने सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांची (पीएसई) बायबॅकसाठीची एक तात्पुरती यादी तयार केली आहे. या यादीत 11 कंपन्यांचा समावेश करण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षात या 11 सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांकडून शेअरचे बायबॅक केले जाणार आहे. उर्जा क्षेत्रापासून ते विमान निर्मिती क्षेत्रातील 11 कंपन्यांची यादी केंद्र सरकारच्या गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाने तयार केली आहे.
या यादीत कोल इंडिया, एनटीपीसी, नाल्को, एनएमडीसी, एनएलसी, बीएचईएल, एनएचपीसी, एनबीसीसी, एसजेव्हीएन, केआयओसीएल आणि हिंदूस्थान एरोनॉटीक्स या कंपन्यांचा समावेश आहे. गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाने 27 मे 2016 ला दिलेल्या मार्गदर्शक तत्वांप्रमाणे या कंपन्यांना बायबॅकची प्रक्रिया करण्याची सूचना देण्यात आली आहे. गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाच्या मार्गदर्शक तत्वांप्रमाणे 2,000 कोटींचे बाजारमूल्य असलेल्या आणि 1,000 कोटी रुपयांची रोकड असलेल्या कंपन्यांना आपल्या शेअरचे बायबॅक करावे लागणार आहे.

अभिप्राय द्या!