म्युच्युअल फंड हाऊसेस कडून मोठ्या प्रमाणात नवनवीन योजना बाजारात आणल्या जात आहेत. मात्र, या योजनांचे मूल्यमापन करून जर निश्चित केलेल्या बेंचमार्कपेक्षा या योजनांची कामगिरी कमी असल्यास त्यांना नवीन फंड स्वीकारण्यास बंदी करण्यात येणार आहे. यासंदर्भात म्युच्युअल फंड अॅडव्हायझरी कमिटीने (एमएफएसी) सेबीला शिफारस केली आहे.
 
याबरोबरच, कामगिरीवर आधारित ‘टोटल एक्सपेन्स रेशो (टिईआर)’ आकारण्यासंदर्भात देखील एमएफएसीने सेबीला सूचना केल्या आहेत. त्यानुसार, जर एखाद्या योजनेने पहिल्या वर्षामध्ये निश्चित केलेल्या बेंचमार्कपेक्षा 2 टक्क्यांनी कमी कामगिरी केल्यास फंड हाउसला आपल्या टीईआरमध्ये 0.25 टक्क्यांची कपात करावी लागेल. तसेच, दुसऱ्या वर्षात देखील अशीच कामगिरी कमी राहिल्यास पुन्हा टीईआरमध्ये 0.25 टक्क्यांची कपात करावी लागेल. तर, सरतेशेवटी तिसऱ्या वर्षात देखील कामगिरी कमीतकमी 2 टक्क्यांचा बेंचमार्क न गाठू शकल्यास टीईआरमध्ये 0.50 टक्क्यांनी कपात करावी लागेल शिवाय, अशा फंड हाउसला तीन वर्षाच्या खराब कामगिरीमुळे आपल्या योजनेवर नवीन विक्रीसाठी सदस्यता बंद करावी लागेल.

अभिप्राय द्या!