आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाने आपला नवा फंड बाजारात आणला आहे. या नव्या फंडाचे नाव ‘आयसीआयसीआय प्रुडेन्शियल मॅन्युफॅक्चर इन इंडिया फंड’ असे आहे. हा एक ओपन एंडेड इक्विटी प्रकारातील फंड आहे. या फंडाद्वारे गुंतवणूकीसाठी मॅन्युफॅक्चरींग क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. हा फंड आज गुंतवणूकीसाठी खुला झाला असून याची अंतिम मुदत 5 ऑक्टोबर ही आहे. ‘आयसीआयसीआय प्रुडेन्शियल मॅन्युफॅक्चर इन इंडिया फंडद्वारे मुख्यत: भारतीय अर्थव्यवस्थेत आणि जीडीपीमध्ये मॅन्युफॅक्चरींग क्षेत्राचे जे योगदान आहे त्यातील फायदे घेण्याचे नियोजन आहे.
सध्या मॅन्युफॅक्चरींग क्षेत्राचा देशाच्या जीडीपीतील वाटा 18 टक्के इतका आहे. मागील चार दशकांमध्ये हाच वाटा 14 ते 16 टक्क्यांदरम्यान होता. आता मात्र या क्षेत्रात मोठीच वाढ दिसून येते आहे. ह्या नव्या फंडाचे मॅनेजर अनिश तावक्ले आणि मित्तुल कालावाडिया असणार आहेत. या फंडातील गुंतवणूकीची किमान रक्कम 5,000 रुपये इतकी आहे. ‘आयसीआयसीआय प्रुडेन्शियल मॅन्युफॅक्चर इन इंडिया फंडात गुंतवणूकीसाठी ग्रोथ आणि डिव्हिडंड असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. या फंडासाठीचा एक्झिट लोड 1 टक्के आहे. जर फंडात गुंतवणूक केल्याच्या 18 महिन्यांच्या आत यातून गुंतवणूक काढून घेण्यात आली किंवा इतर योजनेत वळवण्यात आली तर हा एक्झिट लोड लागणार आहे.

अभिप्राय द्या!