एक चांगला गुंतवणूकदार केवळ चांगली गुंतवणूकच करत नाही तर तो चूका टाळतो, गुंतवणूकीच्या नावाखाली चालणा-या ट्रॅपमधे फसत नाही, भुलथापांना बळी पडत नाही व अभ्यासपूर्ण निर्णय घेतो. पण केवळ इतकेच पुरेसे नाही. अनेकदा गुंतवणूकदार मानसीक चुका करतात ज्यामूळे नुकसान करून घेतात. ह्यासाठी काय करू नये ह्याची ही सूची :

कंपन्यांना आपले शेअर्स किती मूल्याने विकायचे आहे याचा अधिकार असल्याने IPO तील खरेदीत आपल्या अपेक्षेएवढा फायदा होताच विक्री करणे उचित.

 

शेवटी ब्रोकर हा माणूस आहे, चूक होऊ शकते. टिप देताना ब्रोकरने कधी दिली व तुम्हाला ती कधी मिळाली, ती अत्ता इफेक्टिव्ह आहे का? ह्या सर्व बाबींचा विचार करा. केवळ टिप अवलंबून शेअर मार्केटमधे गुंतवणूक करू नका

तांत्रिक विश्लेषणासाठी Softwares उपलब्ध असतात. त्यांचे गणित किंवा तंत्र प्रत्यक्ष बाजारात नेहमीच तग धरू शकत नाही. तेव्हा केवळ तंत्र वापरून चालत नाही. त्याला सद्य परिस्थिती व अनुभवाची जोड लागते..

तिमाही नफ़्यापेक्षा सातत्यपूर्ण कामगिरी महत्वाची. अनेकदा एका तिमाहीत केलेली कामगिरी नंतर घसरू शकते. शिवाय इतर गुंतवणूका, शासकीय व्यवहार ह्याचाही कंपनिच्या बॅलन्सशिटवर परिणाम होत असतो.

शेअर खरेदी केल्यावर सातत्याने खाली येऊ लागल्यास विक्री करणे उचित असते. कधी कधी आपला अंदाज चुकतो, अशा वेळी चूक मान्य करून आहे ती पोजिशन विकून नविन घेणे परडते.