म्यु्च्युअल फंडातील गुंतवणूक सप्टेंबर महिन्यात 12.5 टक्क्यांनी घटली आहे. शेअर बाजारातील अस्थिरतेचा नकारात्मक परिणाम होत म्युच्युअल फंडातील गुंतवणूकीचा ओघ काहीसा आटला आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाने (अॅम्फी) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सप्टेंबर महिन्यात देशातील म्यु्चयुअल फंडांच्या व्यवस्थापनाखालील गुंतवणूक 22.06 लाख कोटी रुपये इतकी झाली आहे. त्याउलट ऑगस्टअखेर हिच रक्कम 25.20 लाख कोटी रुपये इतकी होती. 
 
सप्टेंबर महिन्यात गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर लिक्विड आणि इन्कम फंड योजनांमधून पैसे काढून घेतले आहेत. त्यामुळे म्युच्युअल फंडातील एकूण गुंतवणूकीत 12.5 टक्क्यांनी घट होत 22.06 लाख कोटी रुपयांवर आली आहे. सप्टेंबर महिन्यात जवळपास 2.3 लाख कोटी रुपये गुंतवणूकदारांनी काढून घेतले आहेत. यात लिक्विड फंडातून काढलेल्या 2.11 लाख कोटी रुपयांचा आणि इन्कम योजनामधील म्हणजेच डेट प्रकारातील योजनांमधून काढलेल्या 32,504 कोटी रुपयांचा समावेश आहे. त्याउलट इक्विटी प्रकारातील योजनांमध्ये मात्र 11,250 कोटी रुपये गुंतवणूकदारांनी गुंतवले आहेत.

अभिप्राय द्या!