येत्या एप्रिल-मेमध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या निवडणुका लागण्यापूर्वीच म्हणजे सहा महिनेआधीच देशांतर्गत शेअरमध्ये गुंतवणूक करा आणि घसघशीत परतावा (रिटर्न) मिळवा. शेअर बाजारातील गेल्या २७ वर्षांतील ट्रेंड आणि आकडेवारीतून हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यास हरकत नाही.
या आधी २००९च्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी शेअर बाजारात पैसा गुंतवणाऱ्यांना सर्वाधिक फायदा झाला आहे. त्यावेळी यूपीएची सत्ता आली होती. सर्वात कमी परतावा १ मे १९९९मध्ये मिळाला होता. तेव्हा भाजपची सत्ता आली होती. यावरून लोकसभा निवडणुकीच्या सहा महिने आधी शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास घसघशीत परतावा मिळतो. २०१४ मध्येही लोकसभा निवडणुकीच्या सहा महिनेआधी नोव्हेंबर २०१३ मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना नोव्हेंबर २०१५ मध्ये १४.३ टक्क्यांच्या सरासरीने दरवर्षी घसघशीत परतावा मिळाला होता