मशिन लर्निंगच्या माध्यमातून अंडरायटिंग आधारीत प्रणालीचा वापर करुन डिजीटल ग्राहक कर्ज व्यवसायात आघाडीवर असणार्‍या क्रेडीटेकला आता एनबीएफसी म्हणजेच नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी म्हणून काम करण्याचा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा परवाना देण्यात आला आहे. भारतीय अर्थविश्वाच्या इतिहासात अशा प्रकारचा हा पहिलाच परवाना बहाल करण्यात आला आहे.

नवीन परवान्याबाबत माहिती देताना क्रेडीटेकचे कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष कोहली यांनी सांगितले की, “या परवान्याच्या माध्यमातून आम्ही भारतातील कर्ज पुरवठा क्षेत्रात नव्या युगाला सुरुवात केली आहे. रिझर्व्ह बँकेने आम्हाला हा परवाना देताना आमची मजबूत यंत्रणा, वापरत असणारे तंत्रज्ञान आणि ग्राहक तक्रार निवारण यंत्रणा यांचा प्रामुख्याने विचार केला. त्यामुळे याबाबत आम्ही परवाना मिळवण्याच्या स्पर्धेत असणार्‍या इतर स्पर्धकांवर मात करु शकलो. आमच्यासारख्या ऑनलाईन लेंडर्ससाठी सविस्तर धोरणाची माहिती दिल्याबद्दल आम्ही नियामक मंडळाचे ऋणी आहोत. त्यामुळे आम्ही भारतातील ग्राहकांना सुरक्षित रचनेंतर्गत ऑनलाईन कर्ज पुरवठा करु शकू तसेच बाजारात फक्त गंभीर आणि विश्वासार्ह कंपन्याच काम करु शकतील. आम्ही पूर्णपणे ग्राहकांना प्राधान्य देत असून त्यांच्यासाठी सर्व बाजूंनी फायदा मिळवून देणारी परिस्थिती तयार करुन देत आहोत.”
 
आशिष कोहली यांची एप्रिल 2018 साली क्रेडीटेकच्या कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली असून ते कंपनीचा आशियातील व्यवसाय सांभाळणार आहेत. त्यांना रिटेल फायनान्सिंगमधील 20हून अधिक वर्षांचा अनुभव असून ते नियामकांची बाजू हाताळतील.
 
तंत्रज्ञानातील नवीन क्रांतीमुळे भारतातील ग्राहक कर्ज उद्योगात आमुलाग्र बदल घडून येत आहेत. विस्तृत डेटा आणि मशिन लर्निंग अल्गोरिदमच्या रियल टाईम स्कोरिंग मॉडेल्समुळे हे शक्य होत आहे. सध्या अनेक एनबीएफसी डिजीटल स्पेसवर लक्ष केंद्रीत करत आहेत, आम्ही मात्र बाजाराकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहत असून आमचे बिजनेस मॉडेल संपूर्णपणे डिजीटल एंड-टू-एंड सोल्यूशनवर आधारीत आहे. यामध्ये अगदी प्राथमिक पातळीपासून डिजीटल वितरणापर्यंत विविध सोल्यूशन्सचा समावेश आहे.”

अभिप्राय द्या!