“रिटायरमेंट प्लॅनिंग’ करताना —————–
 
1) बचतीची लवकर सुरवात: आजच्या तरुण पिढीला असे वाटण्याची शक्‍यता आहे, की तरुण वयात आनंदात जगण्यासाठी उपभोग्य वस्तू व इतर खर्च करू की निवृत्तीचा विचार करून बचत करू. पण तरुण वयात आयुष्य उपभोगताना जर थोडी गुंतवणूक केली तर निवृत्तीनंतरचे आयुष्यपण मजेत जगता येईल. जर दरमहा फक्त रु. 1444 “एसआयपी’द्वारे म्युच्युअल फंडात 30 वर्षे गुंतविले आणि 15 टक्के परतावा मिळाला, असे गृहीत धरल्यास अंदाजे एक कोटी रुपये जमू शकतील.
 
2) पॉवर ऑफ कंपाउंडिंग: बॉंड्‌स किंवा डिपॉझिट्‌समध्ये व्याजाची पुनर्गुंतवणूक केल्यास चक्रवाढ व्याजाने किंवा इक्विटी अथवा बॅलन्स्ड फंडामध्ये ग्रोथ पर्याय निवडल्यास महागाईशी सामना करण्यासाठी रक्कम साठवू शकता.
 
3) जाहिराती व प्रचाराचा भूलभुलय्या: प्रचाराला बळी पडून व केवळ इतर जण गुंतवत आहेत म्हणून भरीला पडू नका.
 
4) स्टार रेटेड फंड्‌स: म्युच्युअल फंडांच्या योजनांना रेटिंग एजन्सीजने दिलेले स्टार रेटिंग्ज बदलू शकते. त्यामुळे गेल्या वर्षीची पंचतारांकित रेटिंग असलेली फंडाची तीच योजना या वर्षीसुद्धा तशीच कामगिरी करेल, असे नाही. त्यामुळे फंडाची योजना निवडताना त्याची गेल्या काही वर्षांची कामगिरी, स्टार रेटिंग, पोर्टफोलिओ, फंड मॅनेजरची कामगिरी, बेंचमार्क इंडेक्‍सशी तुलना आदी गोष्टी बघून मग फंड निवडावा.
 
 कोणत्याही गुंतवणूक योजनेत केवळ जास्त कमिशन मिळेल या हेतूने सल्ला न देणारा व अभ्यासू सल्लागार निवडा.
 
“हॅपी रिटायर्ड लाइफ!’

अभिप्राय द्या!