रिलायन्स इंडस्ट्रीजने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत विक्रमी 9,516 कोटी रुपयांचा नफा नोंदवला आहे. रिलायन्सच्या नफ्यात तब्बल 17.35 टक्क्यांची वाढ झाली आहे. रिलायन्सच्या इतिहासातील हा सर्वाधिक विक्रमी नफा आहे. याआधी रिलायन्सने मागील वर्षी 8,109 कोटी रुपयांचा घवघवीत नफा मिळवला होता. मात्र दुसऱ्या तिमाहीत आधीची सर्वच आकडेवारी मागे सारत रिलायन्सने विक्रमी 9,516 कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे. त्याचबरोबर रिलायन्स हॅथवे केबल आणि डेन नेटवर्क्सबरोबरच्या महत्त्वाच्या भागीधारीचीही घोषणा केली आहे. दोन्ही कंपन्यांमध्ये रिलायन्स 25 टक्क्यांपेक्षा अधिक हिस्सा विकत घेणार आहे. त्यामुळे भविष्यात हॅथवे केबल आणि डेन नेटवर्क्सच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणे रिलायन्सला शक्य होणार आहे.

अभिप्राय द्या!