आदित्य बिर्ला सनलाइफ इक्विटी फंडांतून १० ते १२ उद्योग क्षेत्रांमधील ६० ते ६५ समभागात गुंतवणूक केली जाते. वाजवी मूल्यांकन असलेल्या  कंपन्या  हे या फंडाचे तत्त्वज्ञान आहे.

फंडाने सर्वाधिक गुंतवणूक बँकिंग आणि वित्तीय सेवा क्षेत्रात केली असून त्या खालोखाल ग्राहकांच्या पसंतीची उत्पादने असलेल्या मारुती, हिंदुस्थान युनीलिव्हर, पीव्हीआर, युनायटेड स्पिरीट्स, भारती एअरटेल, सेंच्युरी इंडस्ट्रीज, कॅस्ट्रॉल इंडिया, डाबर इंडिया, टायटन, कन्साई नेरॉलॅक, हीरो मोटोकॉर्प इत्यादी कंपन्यांचा समावेश आहे. निधी व्यवस्थापक कन्झ्युमर नॉन-डय़ुरेबल प्रकारच्या कंपन्यांत सरासरी १८ ते २० टक्के गुंतवणूक करतात. दोन एक वर्षांपूर्वी आरोग्य निगा क्षेत्रातील गुंतवणूक १५ टक्क्यांपर्यंत होती. मागील वर्षभरात ही गुंतवणूक कमी करीत ग्राहकाभिमुख कंपन्यांतून गुंतवणूक वाढली आहे. एरिस लाइफ सायन्स, डिशमान फार्मा, डॉ. रेड्डी या सारख्या कंपन्यांचे समभाग हा फंड नव्याने खरेदी करीत असल्याचे दिसत आहे. ‘सेक्टर रोटेशन’ ही या फंडाच्या यशाची गुरुकिल्ली आहे. मागील वर्षभरात फंडाने धातू कंपन्यांत गुंतवणूक वाढविली आणि लगेचच नफावसुली करून विकून टाकली.

पहिली ‘एनएव्ही’ २७ ऑगस्ट १९९८ रोजी जाहीर झालेल्या या फंडात १ हजाराच्या ‘एसआयपी’च्या २.४१ लाखांच्या गुंतवणुकीचे २४.०७ लाख रुपये झाले आहेत. वार्षिक १९.३२ टक्के नफा देणाऱ्या या फंडाचा समावेश मल्टीकॅप गटात ‘शिफारसप्राप्त फंड’ म्हणून झाला आहे. वर्तमानातील गुंतवणूकीवर भविष्यात १० ते १५ वर्षांच्या काळात हा फंड १२ ते १५ टक्के दराने वार्षिक नफा मिळवून देईल.

तरी ज्यांना किमान ४ व जास्तीत जास्त १० वर्षापर्यंत थांबण्याची तयारी असेल त्यांनी ह्यामध्ये खरेदी करावी असा सल्ला आहे !!

अभिप्राय द्या!