भारतीय रिझर्व्ह बँकेने व्याजदरात वाढ करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली असल्याने, गुंतवणूकदार कमी कालावधी विचारात घेता उत्पन्नातील स्थिरता व उच्च अॅक्रुअल यातून फायदा मिळण्यासाठी शॉर्ट टर्म इन्कम फंडांचा विचार करत आहेत. असाच एक फंड म्हणजे यूटीआय शॉर्ट टर्म इन्कम फंड. या फंडाचे उद्दिष्ट, सरासरी मुदतपूर्ती 4 वर्षे असलेल्या मनी मार्केट सिक्युरिटीज व हाय क्वालिटी डेट् पोर्टफोलिओतून कमी जोखीम व उच्च रोखता याद्वारे चांगले उत्पन्न मिळवणे, हे आहे. हा फंड उच्च क्रेडिट गुणवत्ता व पोर्टफोलिओचे वैविध्यीकरण यांना महत्त्व देतो.
“आगामी आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत सीपीआय महागाई 5% च्या दिशेने जाण्याची अपेक्षा असताना, महागाई विशिष्ट प्रमाणापर्यंत नियंत्रित करण्याचा दबाव आरबीआयवर असू शकतो. तसेच, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन झाल्याने आयातीचा खर्च वाढला असल्याने, येत्या काही तिमाहींत सीपीआयसंबंधी जोखीम वाढू शकते. अशा स्थितीत, गुंतवणूकदारांनी शॉर्ट टर्म इन्कम फंडांकडे वळण्यास सुरुवात करावी. कारण, हे फंड हाय अॅक्रुअल व कमी चढ-उतार असणारे आहेत. गुंतवणूकदारांनी 1 ते 3 वर्षे गुंतवणूक करण्याचे उद्दिष्ट ठेवून, आमच्या शॉर्ट टर्म इन्कम फंडांचा विचार करावा.”
यूटीआय शॉर्ट टर्म इन्कम फंडाने सातत्याने क्रिसिल शॉर्ट-टर्म बाँड फंड इंडेक्स या बेंचमार्कपेक्षा सरस कामगिरी केली आहे. फंडाने स्थापनेपासून 8.57% परतावा दिला आहे, तर बेंचमार्कने दिलेला परतावा 7.56% आहे (सप्टेंबर 30, 2018 पर्यंत).