प्रशांत जैन म्हणतात –
भारतीय अर्थव्यवस्था अतिशय मजबूत स्थितीत असून, प्रगतिपथावर आहे. ‘जीएसटी’ किंवा दिवाळखोरी कायद्यासारख्या आमूलाग्र बदलांमुळे तिला आणखी चालना मिळाली आहे. त्यामुळे रुपयाच्या किंवा शेअर बाजाराच्या तात्पुरत्या घसरणीने घाबरण्याचे कारण नाही. त्याऐवजी, शेअर बाजारातील घसरणीचा फायदा घेऊन दीर्घकालीन गुंतवणूक चालू ठेवली पाहिजे. तसेच, गुंतवणूक करताना महागाईदरावर मात करण्यासाठी इतर कोणत्याही गुंतवणूक प्रकारांपैकी ‘इक्विटी’ हाच ॲसेट क्‍लास उत्तम पर्याय आहे !!
 
‘एसआयपी’चा मार्ग उत्तम 
म्युच्युअल फंडातील ‘एसआयपी’ हा गुंतवणुकीचा पर्याय भारतीय नागरिकांसाठी उत्तम असल्याचे सांगत श्री. जैन यांनी त्याला सोन्याच्या गुंतवणुकीचे उदाहरण दिले. ज्याप्रमाणे आपल्याकडे सोन्यात टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करीत ती दीर्घकाळासाठी ठेवली जाते, त्याचप्रमाणे नजीकच्या काळातील शेअर बाजाराच्या पडझडीचा विचार न करता दीर्घकाळासाठी ‘एसआयपी’च्या माध्यमातून गुंतवणूक केल्यास येणारा परतावा उत्तमच राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अभिप्राय द्या!