देशातील सर्वात मोठी एनबीएफसी कंपनी ‘आयएल अँड एफएस’ रोखतेच्या कारणास्तव अडचणीत आल्यानंतर इतर एनबीएफसी कंपन्या देखील अडचणीत सापडल्या होत्या. परिणामी, या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात पडझड होऊन गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला होता. मात्र, आता त्यात सुधार होताना दिसत आहे. ‘आयएल अँड एफएस’ ला आर्थिक कचाट्यातून सोडविण्यासाठी सरकारने पुढाकार घेतल्याने परिस्थितीत सुधार व्हायला सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर, आरबीआयने एनबीएफसी कंपन्यांना पैसे उभा करण्यासाठी नियमांमध्ये शिथिलता आणल्याने रोखतेचे संकट दूर होताना दिसत आहे.
पीएनबी हौसिंग फायनान्स आणि डीएचएफएल या एनबीएफसी कंपन्यांनी कर्जरोख्यांच्या माध्यमातून अनुक्रमे 2500 आणि 6500 कोटी रुपयांच्या उभारणीसाठी बँक आणि वित्त संस्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने कंपन्यांच्या शेअर्समध्ये देखील मोठी खरेदी होताना दिसत आहे.
बुधवार आणि गुरुवार या दोन दिवसात एनबीएफसी कंपन्यांच्या शेअर्समध्ये तब्बल 10 टक्क्यांच्या वर सुधार झाला आहे.

अभिप्राय द्या!

Close Menu