आर्थिक धोरणांवरून विरोधकांच्या टीकेशी सामना करणाऱ्या मोदी सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. जागतिक बँकेकडून दरवर्षी जाहीर करण्यात येणाऱ्या व्यवसाय सुलभतेच्या (ईझ ऑफ डुइंग बिझनेस) सूचीमध्ये भारताने १००व्या स्थानावरून ७७व्या स्थानावर झेप घेतली आहे.

जागतिक बँकेने नुकताच हा अहवाल प्रसिद्ध केला. या सूचीत गेल्या वर्षी १००व्या स्थानी असणाऱ्या भारताने यंदा २३ स्थानांची झेप घेत ७७वे स्थान पटकावले. व्यवसाय सुरू करणे व तो चालवणे यासंबंधी १०पैकी सहा निकषांत भारताची कामगिरी सुधारली असल्याचे जागतिक बँकेने म्हटले आहे. व्यवसाय सुरू करण्यातील सुलभता, आवश्यक परवाने मिळणे, वीजपुरवठा, अर्थसाह्य, कररचना, निर्यातीची संधी, दिवाळखोरीच्या प्रकरणांचा निपटारा करणे आदी आघाड्यांवर भारताची कामगिरी गेल्या वर्षीच्या तुलनेत आणखी चांगली ठरली आहे.

अभिप्राय द्या!

Close Menu