दिवाळीच्या धनलाभ तर्फे वाचकांना हार्दिक शुभेच्छा !!

  • या दिवाळीत खालील समभाग घ्यावेत व पुढील दिवाळीपर्यंत त्यामध्ये भरघोस वाढ होईल अस अंदाज आहे !!
  • इन्फोसिस : नवीन मुख्याधिकारी लाभल्यानंतर कंपनीने विविध व्यवसायांची पुनर्बाधणी करण्याचे योजले आहे. कंपनीच्या २०२०च्या उत्सर्जनानुसार सध्याचा बाजारभाव १५.१ पट गुणोत्तरावर असल्याने पोर्टफोलिओतील हा महत्त्वाचा समभाग ठरावा.
  • आयटीसी : गैर तंबाखुजन्य व्यवसायाचा एकूण महसुलात वाटा सातत्याने वाढत आहे. कंपनीच्या २०२०च्या उत्सर्जनानुसार सध्याचा बाजारभाव २४ पट आहे, तरी एफएमसीजी उद्योगातील समभागांत सर्वात स्वस्त समभाग आहे.
  • आयसीआयसीआय बँक : अनुत्पादित कर्जापोटी करायची बहुतांश तरतूद करून झाली आहे. परिणामी बँकिंग व्यवसायातील हिस्सा वाढण्याची शक्यता आहे.
  • एचडीएफसी बँक : बँकिंग क्षेत्रातील न टाळता येणारा समभाग. सर्वात कमी अनुत्पादित कर्जाचा त्रास असलेली बँक असल्याने सर्वाधिक वृद्धी दर राखलेली बँक अशी ओळख यापुढेसुद्धा ती सार्थ ठरवेल अशी आशा आहे.
  • सन फार्मा : मागील वर्षभरात समभागाचा भाव निम्म्यावर आल्याने, संभाव्य वृद्धीदर पाहता मूल्यांकन नवीन गुंतवणुकीस साजेसे.
  • मिडकॅप : सोनाटा सॉफ्टवेअर, इंजिनीअर्स इंडिया, डीसीबी बँक, एस्कॉर्ट, एनबीसीसी
  • या समभागांचे सध्याचे मूल्य खरेदीसाठी उत्तम स्तरावर असल्याने धनलाभतर्फे हे सुचविण्यात येत आहे !! शेअरखान तर्फे प्राप्त होणाऱ्या समभागांची यादी धनत्रयोदशी दिवशी दिली जाईल !!

अभिप्राय द्या!

Close Menu