जगभरात व्याजदरांत वाढ होत आहे आणि रोकडसुलभता आटत चालली आहे. कमी होणाऱ्या रोकडसुलभतेचा परिणाम उभरत्या अर्थव्यवस्थांवर अधिक दिसून येत आहे. डॉलरच्या तुलनेत या देशांच्या चलनाचे तीव्ररूपात अवमूल्यन होत आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या बाबतीत बोलायचे तर सध्याच्या स्थितीकडे आर्थिक आवर्तनाचा परिणाम म्हणून बघायला हवे. अर्थव्यवस्थेची जितकी चिंता वाटते तितकी चिंता कंपन्यांच्या ताळेबंदाबाबत वाटत नाही. कंपन्यांच्या उत्सर्जनात होत असलेली वाढ ‘इंडिया ग्रोथ स्टोरी’ अद्याप शाबूत असल्याचे द्योतक आहे. मिड कॅप कंपन्यांच्या समभागात झालेल्या घसरणीमुळे मिड कॅप फंडात नव्याने गुंतवणूक करण्याचा गुंतवणूकदार विचार करू शकतात. अर्थचक्राचा दिशाबदल झाल्यानंतर याच कंपन्या भविष्यात भांडवली लाभ देतील. दिवाळीनिमित्ताने होणाऱ्या नवीन गुंतवणुकीसाठी इन्फ्रास्ट्रक्चर आणि मिड कॅप फंडात गुंतवणूक लाभदायक ठरेल असे वाटते.असे मत सौमेंद्रनाथ लाहिरी, मुख्य गुंतवणूक अधिकारी, एल अँड टी म्युच्युअल फंड यांनी सांगितले आहे !!
- Post published:November 4, 2018
- Post category:घडामोडी
- Post comments:0 Comments