गुंतवणूकदारांच्या हृदयाचा ठोका चुकवणाऱ्या शेअर बाजारातील घसरणीला आता फुलस्टॅाप लागताना दिसत आहे. दोन महिन्यात १७५० अंशाची सलग १४.८९ टक्क्यांची घसरण ‘निफ्टी’ या राष्ट्रीय निर्देशांकात झाली. या काळात काही कंपन्यांचे समभाग ५० टक्क्यांन  पर्यंत घसरले आहे. या संधीचा लाभ गुंतवणूकदारांना घेता यावा म्हणून  मागील पंधरा दिवसापासून आम्ही १०,००० अंशावर खरेदीसाठी उत्तम संधी असल्याचे वर्तवत होतो. सध्या  बाजाराच्या वाढीसाठी पोषक वातावरण बनत आहे. कच्च्या तेलाचे भाव सर्वत्तम ८६.२९ वरून आज ७२.६२ डॉलर प्रती पिंप पर्यंत घसरले असून दुसऱ्या बाजूने डॉलर च्या तुलनेत आपल्या रुपयाचा विनिमय दर  (७२.९२) पर्यंत वधारला आहे. जागतिक शेअर बाजारही वाढीत दिसत आहेत. चीन व अमेरिका यांच्यातील वाढलेल्या  व्यापार युद्धाची तीव्रता कमी होण्याचे संकेत मिळत आहेत. असे झाल्यास जागतिक पातळीवर शेअर बाजारात स्थिरता येण्यात मदत होईल. सप्टेंबर तिमाहीचे कंपन्यांचे निकाल अपेक्षित येत असून;  वायदा बाजारातील १२५ कंपनांनी निकाल जाहीर केले असून या पैकी ६२ कंपन्यांनी वार्षिक व तिमाही अंतराने नफा व विक्री वाढते  जाहीर केले आहेत.  हा आकडा साधरण असून अजून ७८ कंपन्यांचे निकाल येणे बाकी  आहे. जर देशातील बिगर बँकिंग क्षेत्रातील कंपन्यांना नगदीची कमतरता पडण्याची व्यक्त केली जात असलेली भीती कमी झाल्यास आपला बाजार पुन्हा आपल्या सर्वच्च शिखराच्या दिसेन जाताना दिसेल. जरी पुढील महिन्यात चार राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका असल्यातरी या बाजूने बाजाराला फार चिंता नाही.

जर ‘निफ्टी’ १०,८८० अंशाच्या वरती एक दिवस टिकला तर पुढे ११,३०० अंशाचे लक्ष फार गतीने गाठले जाईल.

अभिप्राय द्या!

Close Menu