‘सीपीएसई ईटीएफ’चा चौथा टप्पा केंद्र सरकार नोव्हेंबरअखेर बाजारात आणणार आहे. सीपीएसई ईटीएफच्या या आवृत्तीमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील 10 ब्ल्युचीप कंपन्यांचा समावेश असणार आहे. अर्थ मंत्रालयाने या ऑफरमधून 8,000 कोटी रुपये उभे करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. केंद्र सरकारने याआधीच्या तीन आवृत्त्यांमधून 11,500 कोटी रुपयांचा निधी उभा केला आहे. 
 
सीपीएसई ईटीएफच्या या चौथ्या पब्लिक इश्यूमध्ये सरकार आधीच्या आवृत्त्यांमधील तीन सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांना (गेल, इंजिनियर्स इंडिया लि. आणि कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) वगळून चार नव्या कंपन्यांचा समावेश करणार आहे. अर्थ मंत्रालय यासंदर्भातील कारवाईची पूर्तता करते आहे. नोव्हेंबरअखेर अर्थमंत्रालय सीपीएसई ईटीएफच्या चौथ्या पब्लिक इश्युची घोषणा करणार आहे. निर्गुंतवणूकीकरणातून 80,000 कोटी रुपयांचे भांडवल उभे करण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे.

अभिप्राय द्या!

Close Menu