डीएसपी म्युच्युअल फंडाने नवा ‘डीएसपी हेल्थकेअर फंड’ बाजारात आणला आहे. हा एक इक्विटी, ओपन एंडेड प्रकारातील फंड असून याद्वारे आरोग्य आणि औषध निर्मिती क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जाणार आहे. यातील गुंतवणूक मुख्यत: इक्विटी प्रकारातच असणार आहे. हा फंड गुंतवणूकीसाठी आजपासून खुला झाला असून 26 नोव्हेंबर ही त्याची अंतिम मुदत आहे. ‘डीएसपी हेल्थकेअर फंड’ आंतरराष्ट्रीय पातळीवरील औषध निर्मिती क्षेत्रातील कंपन्यांमध्येसुद्धा 25 टक्क्यांपर्यत गुंतवणूक करणार आहे. यात मुख्यत: अमेरिकेतील बड्या कंपन्यांचा समावेश असेल. आदित्य खेमका आणि विनित सांबरे हे या फंडाचे फंड मॅनेजर असणार आहेत. गुंतवणूकदारांनी जर 12 महिन्यांच्या आत यातील गुंतवणूक काढून घेतली तर त्यांना 1 टक्का एक्झिट लोड द्यावा लागणार आहे. ‘भारतातील औषध निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. अलीकडच्या काळातील या क्षेत्रातील कंपन्यांची निराशाजनक कामगिरी असूनसुद्धा भविष्यात या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये उत्तम परतावा देण्याची क्षमता असल्याचे’, मत डीएसपी इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्सचे अध्यक्ष कल्पेश पारेख यांनी व्यक्त केले आहे. 
 
तर ‘भारत हा 2030 सालापर्यत फार्मास्युटीकल्स बाजारपेठेचा महत्त्वाचा भाग बनून टॉप तीन बाजारपेठांमध्ये भारताचा समावेश होईल. त्यामुळे दीर्घकाळात भारतीय कंपन्यांमध्ये चांगला परतावा देण्याची क्षमता आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारच्या आयुष्मान भारतसारख्या योजनांचाही लाभ या क्षेत्राला होणार असल्याने यातील गुंतवणूक निश्चितच चांगला परतावा देईल !!

अभिप्राय द्या!

Close Menu