मी म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणुकीचे नियोजन करतो, तेव्हा अशी गुंतवणूक करताना कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात, याकडे लक्ष देतो. त्यापैकी पुढील प्रमुख नऊ गोष्टींचा मी येथे उल्लेख करीन.
 
१) म्युच्युअल फंडात लाभांश पर्याय शक्‍यतो निवडू नये. या पर्यायात आपलेच पैसे आपणास लाभांश रूपाने मिळतात व तेही लाभांश कर वजा करून!
 
२) एकरकमी पैसे गुंतवताना, पाच वर्षांपेक्षा जास्त गुंतवणूक कालावधी नसेल, तर इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू नये. आपली गुंतवणूक केलेली रक्कम घटण्याची शक्‍यता असते.
 
३) डेट हायब्रिड फंडात गुंतवणूक करू नये. कारण या पर्यायात इतर डेट फंडांपेक्षा जास्त  व्यवस्थापन शुल्क आकारले जाते. याचा परिणाम आपल्या परताव्यावर होऊ शकतो.
 
४) सेक्‍टोरल वा थिमॅटिक किंवा स्मॉल कॅप फंडांमध्ये एकरकमी गुंतवणूक टाळावी. अशा फंडांमध्ये जोखीम प्रमाणाबाहेर असते.
 
५) इक्विटी बॅलन्स्ड फंडामध्ये गुंतवणूक केल्यापासून एक वर्षाच्या आत ‘एसडब्ल्यूपी’ हा पर्याय निवडू नये. एक वर्षाच्या आतील पर्यायामुळे निधीचे मूल्यांकन दीर्घकाळात अपेक्षेपेक्षा कमी मिळू शकते आणि एक वर्षाच्या आत अल्पकालीन भांडवली उत्पन्न कर १५ टक्के लागतो.
 
६) उद्दिष्टाशिवाय ‘एसआयपी’ करणे पूर्णतः टाळावे.
 
७) अल्पकाळासाठी गुंतवणूक करण्यासाठी बाँड फंड, इन्कम फंड, लो ड्युरेशन फंड, जी-सेक फंड टाळावेत. फक्त लिक्विड फंडांचा पर्याय निवडावा.
 
८) क्‍लोज एंडेड फंड, कमी गुणवत्ता दर्जा असणाऱ्या ‘एफएमपी’ यांपासून गुंतवणूक दूर ठेवावी.
 
९) गुंतवणूक खर्च वाचतो, या भ्रमात राहून ‘डायरेक्‍ट’ योजनांमध्ये गुंतवणूक करू नये. आर्थिक सल्लागारांची मदत घेऊन किंवा सल्ला घेऊनच योग्य ती योजना आणि  पर्याय निवडावा.

अभिप्राय द्या!