आता लवकरच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) खातेधारकांसाठी गृहयोजना सुरू होणार आहे. ईपीएफओकडून गृहयोजनेचा प्रस्ताव देण्यात आला असून त्यात त्याअंतर्गत त्यांना स्वस्त घरे उपलब्ध होणार आहेत. सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीच्या येत्या महिन्यात होणाऱ्या बैठकीमध्ये गृहयोजनेचा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे.
 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या खातेधारकांकडे स्वतःचे घर नसेल, अशा खातेधारकांनाच स्वस्तात घरे मिळतील. शिवाय लाभार्थ्याचे खाते उघडून किमान ३ वर्षे झाले असावे आणि घर खरेदीसाठी पीएफ खात्यातून ९० टक्क्यांपर्यंत रक्कम काढता येऊ शकते. किंवा कर्जावरील ईएमआय पीएफ खात्यातून दिला जाणार आहे. 
 
 ईपीएफओकडून ‘नॅशनल हाउसिंग असोसिएशन’ स्थापन करण्याच्या प्रस्तावाचा देखील यात समावेश असून याच नॅशनल हाउसिंग असोसिएशनकडून राज्यांकडून स्वस्त दराने जमीन संपादित करण्यात येईल. 

अभिप्राय द्या!