सुंदरम म्युच्युअल फंडाने नवा ‘सुंदरम इक्विटी सेव्हींग्स फंड’ बाजारात आणला आहे. हा एक ओपन एंडेड प्रकारातील फंड असून याद्वारे इक्विटी, आर्बिट्राज आणि डेट प्रकारात गुंतवणूक केली जाणार आहे. या नव्या फंडाचा एनएफओ 16 नोव्हेंबरला खुला झाला असून 30 नोव्हेंबर ही त्याची अंतिम मुदत आहे. त्यानंतर 14 डिसेंबरला हा फंड गुंतवणूकदारांसाठी पुन्हा उपलब्ध होणार आहे.
तीन गुंतवणूक प्रकारात गुंतवणूकीचा पर्याय निवडून या फंडाद्वारे भांडवल सुरक्षित टेवून चांगला परतावा मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यात इक्विटीबरोबरच फिक्ड इन्कम प्रकारातही गुंतवणूक केली जाणार आहे. एस भारत आणि द्विजेंद्र श्रीवास्तव हे या फंडाचे फंड मॅनेजर असणार आहेत. ऑक्टोबरअखेर सुंदरम म्युच्युअल फंडाच्या गुंतवणूक व्यवस्थापनाखाली 33,819 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे.

अभिप्राय द्या!

Close Menu