स्टर्लिंग अँड विल्सन प्रा.लि.या सौर कंपनीच्या विस्तारासाठी शापोरजी पालनजी समूह हिस्सा विक्रीच्या माध्यमातून तब्बल 1 बिलियन डॉलरची (7100 कोटी) उभारणी करणार आहे. प्री-लिस्टेड स्टेक आणि आयपीओच्या माध्यमातून निधी उभारणी होणार असल्याचे कंपनीचे कार्यकारी संचालक जय मावानी यांनी सांगितले. प्रसिद्ध उद्योगपती पालोनजी मिस्त्री यांच्या मालकीची ही कंपनी आहे. ते यासाठी कंपनीच्या मालकीतील 30 टक्के हिस्सा विक्री करणार आहेत.
स्टर्लिंग अँड विल्सन आर्थिक चालू वर्षात 95 अब्ज रुपयांचा महसूल जमा करेल असा अंदाज चेअरमन खुर्शेद दारुवाला यांनी व्यक्त केला आहे. अभियांत्रिकी आणि बांधकाम सेवा पुरविणाऱ्या कंपनीचा अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये मोठा विस्तार आहे.
शापोरजी पालोनजी हा 40 हजार कोटींचा समूह पालोनजी मिस्त्री यांच्या मालकीचा आहे. अभियांत्रिकी आणि बांधकाम, ऊर्जा आणि पायाभूत सुविधा, रिअल इस्टेट, कापड, आर्थिक सेवा इत्यादी क्षेत्रात कंपनीचा विस्तार आहे.

अभिप्राय द्या!

Close Menu