क्रेडिट कार्डचे फायदे आणि वापरताना घ्यावयाची काळजी
- आर्थिक शिस्त पाळून क्रेडिट कार्डचा वापर केल्यास २० ते ५० दिवसांसाठी बिनव्याजी पैसे वापरायला मिळतात.
- तुमच्या आर्थिक व्यवहारांनुसार क्रेडिट कार्ड मर्यादा ठरविली जाते.
- क्रेडिट कार्डवर अतिरिक्त शुल्क न भरता विमा मिळतो.
- एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरू नयेत.
- क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरावे.
वार्षिक शुल्क साधारणतः 1100 रुपयांपर्यंत. (बँक आणि क्रेडिट कार्ड प्रकारानुसार शुल्क बदलते )
- क्रेडिट कार्ड वापरताना शक्यतो हप्त्यांचा पर्याय टाळावा. अन्यथा व्याज भरावे लागते. तसेच, हप्ता चुकविल्यास अतिरिक्त दंड वेगळा.
- क्रेडिट कार्डचा वापर एटीएम म्हणून नको. प्रत्येक ठिकाणी वापर टाळावा. तसेच कॅश क्रेडिट घेण्याचा मोह टाळावा.
- क्रेडिट कार्डचा वापर योग्य झाल्यास सिबिल स्कोअर चांगला राहून विविध कर्जाचे पर्याय सतत उपलब्ध होतात. मात्र, रिपेमेंट करताना डिफॉल्ट झाल्यास
सिबिलवर वाईट परिणाम होऊन कर्ज, नवीन क्रेडिट कार्ड किंवा बँकांचे विविध फायदे मिळण्यापासून वंचित राहावे लागते. - क्रेडिट कार्डचा वापर व्यवसाय उभारणीवेळी हक्काच्या पैशांचा स्रोत वापरू नये.
*क्रेडिट कार्डचे मुद्दल परत करणे शक्य न झाल्यास सेटलमेंटचा पर्याय असतो. मात्र, त्यामुळे त्याचा सिबिलवर परिणाम होऊ शकतो. तसेच, पुढील कर्ज घेताना अडचण येऊ शकते. त्यामुळे क्रेडिट कार्डचे बिल वेळेत भरणे उत्तम